ताज्या बातम्या

Latest Marathi News Update live : साताऱ्याच्या कराडमध्ये मतदानास गालबोट

Marathi Live Headlines Updates: आज शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Varsha Bhasmare

Zilla Parishad Election : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज निवडणूक

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज निवडणूक आहे आणि सोमवारी 9 तारखेला मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडणार आहे. यासोबतच 9 तारखेला सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे.

Text Devendra Fadnavis : महानगरपालिका विजयाच्या यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेलंगणात प्रचारासाठी मैदानात

महाराष्ट्रातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता या विजयाचा अनुभव इतर राज्यांत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तेलंगणा दौऱ्यावर असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरले आहेत.

Mega Block : मुंबईकरांसाठी रविवारी प्रवासाचे नियोजन आवश्यक; मध्य व पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी तसेच देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर परिणाम होणार असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रकाची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Ola, Uber, Rapido : आज ओला, उबर, रॅपिडो कंपनीच्या कॅब आणि रिक्षा चालकांनी दिली बंदची हाक

(Ola, Uber, Rapido ) आपल्या विविध मागण्यांसाठी ॲप आधारित वाहन चालकांनी आज शनिवारी बंदची हाक दिली आहे. 7 फेब्रुवारीला उद्या ओला, उबर, रॅपिडो कंपनीच्या कॅब आणि रिक्षा चालकांकडून बंदची हाक देण्यात आली असून त्यामुळे ॲप आधारित सर्व टॅक्सी सेवा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

8th Pay Commission : केंद्र कर्मचाऱ्यांना दिलासा, डीएमध्ये २% वाढ होण्याची शक्यता

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. सातव्या वेतन आयोगानंतर आता सर्वांचे लक्ष आठव्या वेतन आयोगाकडे लागले असले, तरी त्याआधीच महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असून, याचा थेट फायदा लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

Maharashtra Weather Update : राज्यातील वातावरणात मोठा बदल, उकाडा-थंडी-पावसाचा विचित्र खेळ

राज्यातील हवामानात सध्या मोठ्या प्रमाणावर बदल पाहायला मिळत आहे. कधी थंडी, कधी उकाडा तर कधी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या सरी असा संमिश्र अनुभव नागरिक घेत आहेत. डिसेंबर महिन्यात राज्यात चांगली थंडी जाणवत होती, मात्र जानेवारीच्या सुरुवातीपासूनच हवामानात बदल होऊ लागला. फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी-जास्त राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने आधीच वर्तवला होता आणि तो आता प्रत्यक्षात दिसून येत आहे.

Matheran E ricksh : माथेरानच्या ई-रिक्षांचा १० तारखेपासून बंद !

माथेरानमध्ये येत्या १० फेब्रुवारीपासून सर्व ई-रिक्षा सेवा बंद ठेवण्याचा निर्णय श्रमिक रिक्षा संघटनेने घेतला आहे. हातरिक्षा या अमानवीय प्रथेतून श्रमिकांची कायमस्वरूपी मुक्तता व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले असतानाही राज्य सरकारकडून ठोस अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

Ladki Bahin Yojana eKYC: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; 'या' तारखेपर्यंत ई-केवायसीसाठी मुदतवाढ

(Ladki Bahin Yojana eKYC) लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. ई-केवायसी करताना काही जणांकडून पर्याय निवडताना चूका झाल्या होत्या. या ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

(Sunetra Pawar) राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज निवडणूक आहे आणि सोमवारी 9 तारखेला मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडणार आहे.

Ashish Shelar : सी लिंक व कोस्टल रोडसाठी हवाई आपत्कालीन सुविधा गरजेची; ॲड. आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबईतील वांद्रे–वरळी सी लिंक, वर्सोवा–वांद्रे–वरळी सी लिंक आणि संपूर्ण कोस्टल रोडसारख्या महत्त्वाच्या वाहतूक मार्गांवर भविष्यात उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी हवाई आपत्कालीन सुविधांची नितांत गरज असल्याचे मत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे. याच अनुषंगाने वांद्रे रेक्लेमेशन परिसरात सी लिंकजवळ हेलिपॅड उभारण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Ladki Bahin Yojana eKYC: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; 'या' तारखेपर्यंत ई-केवायसीसाठी मुदतवाढ

(Ladki Bahin Yojana eKYC) लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. ई-केवायसी करताना काही जणांकडून पर्याय निवडताना चूका झाल्या होत्या. या ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. ई-केवायसी करताना पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडण्यात आल्याने अनेक महिलांना लाभापासून वंचित राहावे लागणार होते.

Mumbai Mayor : मुंबई महापौराबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचा आज निर्णय होणार

(Mumbai Mayor) महापालिका निवडणुकींचे निकाल लागले. आता या निकालानंतर लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर आणि उपमहापौर कोण होणार? याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगर पालिकेत महापौर, उपमहापौर निवडणुकीत उमेदवार देण्याविषयी ठाकरेंच्या शिवसेनेचा आज निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mumbai-Pune Expressway Traffic : मुंबई–पुणे महामार्गावरील 32 तासांचं वाहतूक कोंडी प्रकरण: वाहतूककोंडी करणाऱ्या टँकर चालकावर गुन्हा दाखल

(Mumbai-Pune Expressway Traffic ) मुंबई–पुणे महामार्गावर 32 तास वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ टँकर पलटी झाला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

Mumbai Bmc : शिवसेनेचे संजय घाडी मुंबईचे उपमहापौर

शिवसेनेचे संजय घाडी यांच्या नावाची घोषणा मुंबईच्या उपमहापौर पदी झाली आहे. पुढील सव्वा वर्षासाठी संजय घाडी यांनी उपमहापौर पदाची जबाबदार स्वीकारली आहे.

Mumbai Bmc : मुंबईच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडेंच्या नावाची घोषणा 

मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

Sanjay Raut : अजित पवारांच्या मृत्यूवर संशय, संजय राऊतांचा फडणवीसांना थेट सवाल

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात होऊन स्फोट झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तत्काळ प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हा अपघात असून त्यामागे कोणताही घातपात नसल्याचे स्पष्ट केले होते.

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला

( NCP ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे यांच्या पतीवर हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Wardha: वर्ध्याच्या देवळी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

खासदार अनिल बोंडे, आमदार राजेश बकाने, आमदार देवराज भोंगळे माजी खासदार रामदास तडस सुरेश वाघमारे व मान्यवरांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याचा शुभारंभ

आमदार राजेश बकाने यांच्या संकल्पनेतून रोजगार मेळावा

मेळाव्यातून मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना मिळणार रोजगार

रोजगार मेळाव्याला अनेक बेरोजगारांची उपस्थिती

Karad: बोगस मतदानावरुन भाजप - राष्ट्रवादी कॉंग्रेस आमनेसामने

कराड तालुक्यातही वडगाव हवेलीत तणावपुर्ण स्थिती

राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या कऱ्हाड तालुक्यातील वडगाव हवेली येथे वादवादी

वडगाव हवेली केंद्र परिसरात काहीकाळ तणाव

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला

Pune: पुण्यातील एरंडवणे भागात अपघात

कार चालकाच नियत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकाला धडकली…

अपघातत कार थेट पलटी

तर मागून आलेला दुचाकी चालक धडकला

अपघाताच सीसीटीवी समोर

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकी साठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 63 जिल्हा परिषद आणि 126 पंचायत समितीसाठी मतदान प्रक्रिया होत आहे यावेळी पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी सिल्लोड तालुक्यातील विविध मतदान केंद्राला भेट दिली यावेळी मतदान शांततेत सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

बार्शीतील पानगावमध्ये नवरदेवाने लग्नाआधी बजावला मतदानाचा अधिकार

घोड्यावरील वरात थेट मतदान केंद्रात नेत बजावला मतदानाचा अधिकार

- पानगाव येथील आनंद जयराम मोरे यांच्या कृतीमुळे मतदाराची सर्वत्र चर्चा रंगलीय

- जयराम मोरे हे प्रशिक्षणार्थी बीडीओ म्हणून कार्यरत आहेत मात्र विवाहासाठी ते गावी आले होते.

- मतदानाबाबत जागृती व्हावी म्हणून त्यांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बाजवला.

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये बॉम्बस्फोट

पाकिस्तानच्या राजधानीत इस्लामाबाद येथे झाला. या हल्ल्यात ३१ जणांचा मृत्यू झाला असून १६९ जण जखमी झाले आहेत. अलीकडच्या वर्षांतील शिया समाजावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी हा एक मानला जात आहे. हा शक्तिशाली स्फोट टारलाई भागातील खदिजतुल कुब्रा मशीद व इमामबारा येथे झाला. या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.

Raigad: रायगडच्या खोपोली नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार उघड

67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचं नगरपरिषदेत अर्धनग्न आंदोलन

गेली 5 वर्ष घरासमोरील गटार बांधकामासाठी नगरपरिषदेत अनेक फेऱ्या

मात्र प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्याचं समोर

Pandharpur Rada :  पंढरपूरच्या करकंब जिल्हा परिषद गटात 2 गटात राडा...

पंढरपूरच्या करकंब जिल्हा परिषद गटात 2 गटात राडा... आमदार अभिजीत पाटलांचे बंधू अमर पाटील आणि भाजप उमेदवार आदिनाथ देशमुख यांच्यात जोरदार खडाजंगी .....

Ch. Sambhajinagar:  छ. संभाजीनगरमध्ये 2 बोगस मतदार ताब्यात…

छ संभाजीनगरमध्ये 2 बोगस मतदार ताब्यात…मृत व्यक्तीच्या जागी बोगस मतदान केल्याचा आरोप… डोंगरगाव जिल्हा परिषद सर्कलमधील गंभीर प्रकार

Solapur : ईव्हीएम मशीन खाली जादूटोणा केल्याचा आरोप…

ईव्हीएम मशीन खाली जादूटोणा केल्याचा आरोप… सोलापुरातील मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावरील प्रकार .. ईव्हीएमखाली खिळा टोचलेले लिंबू मिरची आढळून आले.

Satara : साताऱ्याच्या कराडमध्ये मतदानास गालबोट…

साताऱ्याच्या कराडमध्ये मतदानास गालबोट…कराड विमानतळ परिसरात मतदारांना पैसे वाटपाचा प्रयत्न… काँग्रेस समर्थकाला रोखलं, व्हिडिओ व्हायरल

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा