ताज्या बातम्या

Operation Sindoor : '...तर त्वरित संपर्क साधा'; NIA नं केलं 'त्या' पर्यटकांना आवाहन

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर आता राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) भारतीयांसाठी महत्त्वांचा संदेश दिला आहे.

Published by : Rashmi Mane

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर आता राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) भारतीयांसाठी महत्त्वांचा संदेश दिला आहे. त्यांनी सर्व पर्यटक आणि स्थानिकांना पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याबाबतची माहिती देण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी नुकतचं एक्स पोस्टद्वारे याची माहिती दिली. एनआयएने त्यांचा संपर्क क्रमांकही जारी केला आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सर्व पर्यटक आणि स्थानिक लोकांना आवाहन केले आहे की, ज्यांच्याकडे Pahalgam Terror Attack बाबत अधिक माहिती, छायाचित्रे किंवा व्हिडिओ असतील, त्यांनी त्वरित एजन्सीशी संपर्क साधावा. एनआयएने अशा सर्व लोकांना 9654958816 या मोबाईल क्रमांकावर किंवा 01124368800 या लँडलाइन क्रमांकावर एजन्सीला कॉल करून त्यांची वैयक्तिक माहिती आणि त्यांना कोणत्या प्रकारची माहिती शेअर करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर एनआयएचा एक वरिष्ठ अधिकारी कॉल करणाऱ्याशी संपर्क साधेल. संबंधित माहिती, फोटो, व्हिडिओ इत्यादी एजन्सीसोबत शेअर करण्याची व्यवस्था करेल, अशी माहिती पोस्टद्वारे देण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Satara Rain Update : साताऱ्यात पूरस्थिती गंभीर! कृष्णा-कोयना नद्या ओसंडून वाहिल्या, 350 नागरिकांचे स्थलांतर

Video Viral : हिंदुस्तान जिंदाबाद... लंडनमध्ये मुस्लिम मुलींचं तिरंग्यासाठी भिडल्या; नेमकं प्रकरण काय?

AsiaCup 2025 : ...तरीही त्याला संघात संधी! कॅप्टन दादाकडून 'या' खेळाडूबद्दल महत्त्वाचं वक्तव्य; म्हणाला,

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द