ताज्या बातम्या

Delhi Blast : दिल्ली दहशतवादी स्फोटाची NIA करणार चौकशी, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटामध्ये झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • दिल्ली दहशतवादी स्फोटाची NIA करणार चौकशी

  • गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

  • स्फोट आत्मघाती हल्ला?

आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटामध्ये झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गृह मंत्रालयाने या घटनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. त्यामुळे आता NIA या प्रकरणाचा पुढील तपास करेल. या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक बोलावली. सकाळी ११ वाजता बैठक सुरू झाली. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. कार स्फोटाचा तपास बैठकीनंतरच एनआयएकडे सोपवण्यात आला. तसेच देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, गुप्तचर विभागाचे (आयबी) संचालक, दिल्ली पोलीस आयुक्त आणि एनआयएचे महासंचालक यांच्यासह बरेच वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील कार स्फोटाने राजधानी दिल्लीसह देश हादरला आहे. स्फोटानंतर तातडीने तपास कार्याला वेग आला असून, केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षा विभागाशी चर्चा करून तपासकार्याला गती दिली. आज दिवसभरात अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. आता या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला आहे. यासंबंधीचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केला. दरम्यान, या स्फोटाचे कनेक्शन फरिदाबाद मॉड्यूलशी जोडले गेले आहे. काही दिवसांपूर्वी काश्मीर पोलिसांनी केलेल्या कारवाईत फरिदाबादमधून डॉ. जम्मिल शकील आणि लखनौमधून महिला डॉ. शाहिना शाहिदला बेड्या ठोकल्या होत्या. त्यांचे जैश-ए-मोहमदशी कनेक्शन आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठकीनंतर आम्ही सर्व शक्यतांचा शोध घेत आहोत आणि सर्व बाबी लक्षात घेऊन सखोल चौकशी करू. या हल्ल्यासाठी वापरलेली ुंदाई आय-२० कार आणि दहशतवाद्यांचे संबंध तपासले जात असून, संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, असे म्हटले. या कार स्फोटाची तीव्रता इतकी होती की, जवळपासच्या अनेक वाहने जळून खाक झाली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, परिसर आगीने वेढला गेला आणि जखमी मदतीसाठी ओरडत होते.

स्फोट आत्मघाती हल्ला?

दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा स्फोट आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता आहे. फरिदाबाद मॉड्यूलच्या अटकेची माहिती मिळताच संशयिताने आत्मघाती हल्ल्याची योजना आखल्याचे तपासात उघड झाले आहे. आता स्फोटामागील हेतू निश्चित करण्यासाठी सर्व संबंधित एजन्सी प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत. महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने मुंब्रा येथे छापेमारी करून दोन जणांची कसून चौकशी सुरू केली. या दोघांकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्यांचे अ‍ॅनॅलिसिस केले जाणार आहे. मुंब्रा येथील या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली.

डॉक्टरांनी रचला स्फोटाचा कट?

देशात मोठे दहशतवादी नेटवर्क उघडकीस आले असून, या प्रकरणात डॉ. आदिल अहमद राठर आणि डॉ. मोहम्मद उमर यांची नावे समोर आली. डॉ. उमर हा जिथे स्फोट झाला, त्या कारमध्ये होता, अशी शंका व्यक्त केली जात आहे तर डॉ. आदिलला सहारनपूरमधून अटक केली. या आधी डॉ. मुझम्मिल शकील याला फरिदाबाद येथून तर डॉ. शाहीन शाहिदला लखनौमधून अटक केली. स्फोटामागे ६ डॉक्टरांचे कनेक्शन असल्याचे उघडकीस आले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा