कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे आमदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकाश बिडवलकर हत्येप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे. बिडवलकर हत्येप्रकरणी पोलिसांनी वैभव नाईक यांची चौकशी करावी. २००९ पासूनचे त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासावे, या प्रकरणाचा छडा लावावा, असे आवाहन नीलेश राणे यांनी यावेळी केले. तसेच वैभव नाईकांची या प्रकरणातून सुटका नाही. त्यांना जे काही माहिती असेल ते सर्वांसमोर आणावेच लागेल. त्याशिवाय मी शांत बसणार नाही, असेही राणेंनी नमूद केले.