ताज्या बातम्या

2 हजारच्या नोटेबाबत मोठी अपडेट; अर्थमंत्र्यांचा खुलासा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : तुमच्याकडेही 2 हजार रुपयांची नोट असेल तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज महत्वाची माहिती दिली आहे. नोटाबंदीच्या सुमारे 6 वर्षानंतर केंद्र सरकारकडून चलनी नोटांबाबत माहिती देण्यात आली आहे. सध्या सर्वत्र 2 हजार रुपयांच्या नोटेची चर्चा पाहायला मिळत आहे. मागील काही वर्षांत या नोटा खूपच कमी झाल्या आहेत. 2 हजारच्या नोटांबाबत रिझर्व्ह बँकेने बँकांना काही आदेश दिले आहेत का? खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच संसदेत याबाबत मोठा खुलासा केला आहे.

आजकाल बँकांच्या एटीएममधून 2 हजार रुपयांऐवजी 500 आणि 200 रुपयांच्या नोटा बाहेर येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 2 हजार रुपयांच्या नोटा बाजारातून काढून टाकण्याचा सरकारचा विचार आहे का? हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला आहे. लोकसभेत खासदार संतोष कुमार यांनी अर्थमंत्र्यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. याचे उत्तरे अर्थमंत्र्यांनी दिले आहे.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार मार्च 2017 आणि मार्च 2022 अखेर 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य 9.512 लाख कोटी आणि 27.057 लाख कोटी होते.

रिझर्व्ह बँकेने बँकांना अशा कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. कोणत्या मूल्याची नोट आणि कधी एटीएममध्ये टाकायची हे बँकेनेच ठरवले आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार 2019-20 सालापासून 2 हजार रुपयांची नोट छापण्यात आलेली नाही, असा खुलासा सीतारामन यांनी केला आहे.

Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Rahul Gandhi : रायबरेलीतून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं