ताज्या बातम्या

Budget 2026 : निर्मला सीतारमण यांचा ‘बजेट लूक’ चर्चेत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत देशाचा 2026 चा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असून, आर्थिक घोषणांसोबतच यावेळी त्यांचा ‘बजेट लूक’ देखील चर्चेचा विषय ठरला आहे. दरवर्षीप्रमाणे

Published by : Varsha Bhasmare

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत देशाचा 2026 चा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असून, आर्थिक घोषणांसोबतच यावेळी त्यांचा ‘बजेट लूक’ देखील चर्चेचा विषय ठरला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निर्मला सीतारमण यांनी परिधान केलेली साडी केवळ फॅशनपुरती मर्यादित न राहता भारतीय परंपरा, संस्कृती आणि अर्थपूर्ण संदेश देणारी ठरली आहे.

यंदा अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारमण यांनी हाताने विणलेली वांगी रंगाची कांचीवरम सिल्क साडी नेसली आहे. ही साडी तमिळनाडूच्या प्राचीन आणि समृद्ध विणकाम परंपरेचे प्रतीक मानली जाते. साडीवर हलक्या सोनेरी रंगाचे चेक्स असून, सोनेरी धाग्याच्या नाजूक कामासह कॉफी ब्राउन रंगाचा बॉर्डर देण्यात आला आहे. या साडीमधून पारंपरिक सौंदर्य आणि साधेपणाचा सुरेख संगम दिसून येतो.

वांगी रंगाचं विशेष महत्त्व

निर्मला सीतारमण यांनी निवडलेला वांगी रंग केवळ सौंदर्यदृष्ट्या आकर्षक नाही, तर त्याचा सामाजिक अर्थही खोल आहे. वांगी रंग हा महिला सशक्तीकरण, गरिमा, न्याय आणि समानतेचे प्रतीक मानला जातो. हा रंग आंतरराष्ट्रीय महिला दिन तसेच स्त्री हक्कांच्या चळवळीशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार किंवा आर्थिक मदतीसंबंधी विशेष तरतुदी असतील का, याकडे लक्ष वेधले गेले आहे. अनेकांना या रंगातून अर्थसंकल्पातील धोरणांचा एक सूचक संदेश मिळतो आहे.

मागील वर्षीची मधुबनी कलेची साडी

मागील वर्षी म्हणजेच 2025 च्या अर्थसंकल्पावेळी निर्मला सीतारमण यांनी बिहारच्या प्रसिद्ध मधुबनी कलेने सजलेली ऑफ-व्हाइट सिल्क साडी परिधान केली होती. ही साडी त्यांना पद्म पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध मधुबनी चित्रकार दुलारी देवी यांनी भेट दिली होती. त्या साडीवर ‘मास्या’चे डिझाइन होते, जे सुख, समृद्धी आणि विकासाचे प्रतीक मानले जाते. त्यावेळीही त्यांच्या साडीने देशभरात लक्ष वेधून घेतले होते.

निर्मला सीतारमण : थोडक्यात परिचय

निर्मला सीतारमण यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 रोजी तमिळनाडूच्या मदुराई येथे झाला. त्यांनी तिरुचिरापल्ली येथील सीतालक्ष्मी रामास्वामी कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली, तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. राजकारणात येण्यापूर्वी त्या कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत होत्या. 2006 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. 2014 मध्ये मोदी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले. 2017 मध्ये त्या भारताच्या संरक्षणमंत्री झाल्या आणि 2019 पासून त्या देशाच्या अर्थमंत्री म्हणून कार्यरत आहेत

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा