शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फिट राहणे अत्यंत गरजेचे आहे. सोशल मीडियाच्या या युगात फिटनेस हा एक ट्रेंड झाला आहे. त्यातच सेलेब्रिटींचा फिटनेस म्हणजे ब्रेकिंग न्युज बनले आहे. नियमित योग्य' व्यायाम, जिम आणि सकस संतुलित आहार याद्वारे आजकालच्या अभिनेत्री एकदम फिट आणि फाईन राहतात. अभिनेत्रीच्या फिटनेसची चर्चा तर आपण ऐकतच असतो. त्यांचा एखाद्या इव्हेंट मधला लूक असू दे किव्हा नॉर्मल लूक. त्यांच्या फिटनेसची आणि लूकची चर्चा होत असते. असचं एक व्यक्तिमत्व ज्याच्या फिटनेसने बॉलिवूडच्या ही अभिनेत्रींना मागे टाकले आहे त्या म्हणजे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आहेत.
नीता अंबानी या आपल्या लूक्स ,फिटनेस आणि फॅशनसाठी नेहमी ट्रेंडमध्ये असतात. त्यासाठी त्या नियमितपणे संतुलित आहार, योगा त्याचबरोबर योग्य व्यायाम ही करतात. त्याच्या या ग्लॅमरस फिटनेसच्या यशाचे रहस्य म्हणजे त्यांचे पर्सनल ट्रेनर विनोद चन्ना. १६ वर्षाचा अनुभव असलेले विनोद हे एक्स्पर्ट जिम ट्रेनर आणि सल्लागार आहेत. वांद्रे येथे असलेल्या V fitness सेन्टर चे ते संस्थापक आहेत. त्यांच्या वयानुसार योग्य व्यायाम आणि परफेक्ट डायट प्लॅन कन्सेप्ट मुळे कमी वेळेत इच्छित परिणाम साधला जातो.
आघाडीच्या नामांकित सेलिब्रिटीपैंकी एक असलेले विनोद चन्ना हे केवळ अंबानी कुटुंबियांचे पर्सनल ट्रेनर नसून ते एक सेलिब्रिटी ट्रेनर आहेत. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रिटीच्या फिटनेससाठी पर्सनल कोचिंग केली आहे. त्यात जॉन इब्राहिम , शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय , हर्षवर्धन राणे यांचा ही नंबर लागतो. वयाच्या 60 मध्ये असताना ही 40 वर्षाच्या अभिनेत्रींना ही मागे टाकत नीता अंबानी फिटनेस सिलेब्रिटी ट्रेनर विनोद चन्ना यांचा हात आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या यशामध्ये सगळ्यात मोठे यश म्हणजे अनंत अंबानी याचे 100 किलो पेक्षाही जास्त वजन केवळ 18 महिन्यात कमी करून दाखवले. केवळ अनंत अंबानींच नाही तर त्यांनी नीता अंबानी यांचे ही 18 किलो वजन कमी करायला मदत केली आहे.
सुरुवातीला कमी फीस आकारणारे ट्रेनर विनोद चन्ना सेलिब्रिटी क्लायंट मिळायला लागल्यावर जास्त फीस आकारू लागले. नीता अंबानींचे फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना 12 सेशनसाठी 1.5 लाख रुपये इतकी फीस घेतात. आणि जर होम ट्रेनिंग असेल तर 2 ते 2.5 लाखापर्यंत फीस घेतात. आता विनोद चन्ना हे ऑन लाईन ही वर्क आउट घेत असून 500 रुपयांपासून त्यांची फीस चालू आहे. त्यामुळे सर्वसामान्याना ही यांच्या ट्रेनिंगचा लाभ घेणे शक्य होणार आहे.