ताज्या बातम्या

penguin कार्टा nightlife च्या नावाने सगळीकडे Ranjeet बनून फिरतो त्याचे काय? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Published by : Siddhi Naringrekar

दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या दसरा मेळाव्यात एकमेकांवर जोरदार आरोप - प्रत्यारोप ही केले गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात पार पडला तर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा वांद्रे- कुर्ला संकुलात झाला.

या दसरा मेळाव्यात शिंदे आणि ठाकरे यांनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाकीच्या गोष्टींसोबत शिंदे कुटुंबावर देखिल आरोप केले की, बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या अशा शब्दात त्यांनी शिंदेंना सुनावले. यावर प्रतिउत्तर देत शिंदे म्हणाले की, “तुम्ही माझ्या दीड वर्षाच्या नातवाला राजकारणात ओढत आहात. तुम्हाला सांगतो ज्या दिवशी त्याचा जन्म झाला तेव्हाच तुमचे पतन सुरू झाले. असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले.

याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत म्हणाले की, दुसऱ्यांची मुलं कार्टी. लहान नातवंडांना पण नावं ठेवणार. यांचा penguin कार्टा. nightlife च्या नावाने सगळी कडे Ranjeet बनून फिरतो तेच काय? मग Disha Salian बद्दल पण बोला. 8 June च्या पार्टी मधे आणलेली लहान मुलं पण कुणाची नातवंड होती? तेही तुमच्या आदित्य कार्ट्या ला विचारा जरा असे आरोप नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केले आहेत.

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ

Wedding Rituals: हिंदू धर्मात लग्नाच्या वेळेस का केली जाते सप्तपदी? जाणून घ्या कारण...

Wedding Rituals: लग्नात का चोरतात नवरदेवाचे बूट? रंजक आहे यामागचं कारण

"त्या पदावरून शरद पवार बाजूला गेले आणि..." बारामतीच्या सभेत अजित पवारांनी सांगितला मोठा किस्सा