दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी मुंबईत स्थापन केलेल्या शिवसेनेचा 59वा वर्धापनदिन सोहळा गुरुवारी संपन्न झाला. पण 2022 साली एकसंध शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडामुळं यंदा सलग तिसऱ्या वर्षी शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे दोन सोहळे मुंबईत साजरे करण्यात आले. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन सोहळा करण्यात आला होता. या वर्धापन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी महायुतीवर टीकास्त्र केले. या टीकांना उत्तर देण्यासाठी भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे.
यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले की, "बाळासाहेब यांच्या मुलाला हिंदुत्वाच काम जर मी करत असेल तर खटकणारच कारण आहे. बाळासाहेबांनी ठाकरे हा ब्रँड मोठा केला पण नंतरच्या पिढीने हिंदुत्त्वाची साथ सोडल्याने ठाकरे ब्रँडची चिंता वाढलेली आहे. स्वतःचा मुलगा कसा आहे? हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे मला पेंग्विन बोलून काही फरक पडत नाही. स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे. तो बाई आहे की, पुरुष आहे लोकांना कळत नाही. स्वतःच्या मुलाची अवस्था बघा. त्यामुळे त्यांचा राग माझ्यावर असणे साहाजिक आहे. दिनो आणि दिशाबद्दल माहिती देत आहे, म्हणून टीका केली जाते. स्वतःच्या मुलाचं नाईट लाइफ कमी केलं असत तर हे टाळत आलं असत. मी हिंदुत्त्वाचं काम करतोय म्हणून मुल्ले मौलवींना खुश करण्यासाठी नितेश राणेंवर टीका करावी लागते. हे माझ्यासाठी मेडल आहे. हिंदूच्या गब्बरची दखल घेतली की नाही."