Nitesh Rane  Team Lokshahi
ताज्या बातम्या

नितेश राणे आज कोल्हापूर पोलिसांना जाब विचारणार

कोल्हापूरमधील वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. अद्यापही संबंधित मुलीचा तपास लागलेला नाही.

Published by : Vikrant Shinde

सतेज औंधकर, कोल्हापूर

अमरावतीनंतर आता कोल्हापुरात लव्ह जिहादच्या प्रकाराला हिंदु गवळी समाजातील मुलगी बळी पडल्याचा संशय हिंदुत्त्ववादी संघटनांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे, कोल्हापूरमधील वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. अद्यापही संबंधित मुलीचा तपास लागलेला नाही.

14 वर्षाची अल्पवयीन मुलगी गेल्या 15 दिवसापासून बेपत्ता आहे. त्यावरून लव्ह जिहादचा संशय हिंदुत्ववादी संघटना व्यक्त करत आहेत. या प्रकरणी आज नितेश राणे कोल्हापुरात दाखल होऊन पोलिसांना जाब विचारणार आहेत. तर, हिंदुत्ववादी संघटनांनी नितेश राणे यांच्या आजच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

काल गवळी समाजानेही पोलिसांची भेट घेत योग्य तपास करण्याची मागणी केली. मात्र यावेळी पोलीस आणि गवळी समाजाच्या नागरिकांत शाब्दिक वाद झाला. निवेदन देण्यासाठी आलेल्या गवळी समाजाच्या शिष्टमंडळात थेट शासकीय कामात अडथळा करत असल्याचं बोलतच वाद वाढतच गेला. दरम्यान योग्य तो तपास करून मुलीचा लवकर शोध घ्यावा अन्यथा महाराष्टाभर आंदोलन करू असा इशारा गवळी समाजाने दिला आहे

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा