सरकारविरोधात न्यायालयात याचिका टाकायला काही लोक समाजात असायलाच हवेत. म्हणजे समाजात राजकीय लोकांना शिस्त लागते, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्च सुरू झाल्या आहेत.
नागूरमध्ये झालेल्या स्वर्गीय प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सरकारला धारेवर धरले. त्यांनी त्यांच्या मिश्किल स्वभावानुसार आपल्या शैलीत सरकारविषयी मत मांडले. "सरकारने अनेक अनुदान संपवले. अनेक भानगडी झाल्या, या सगळ्या काळात शिक्षणाच्या हितामध्ये ते प्रश्न सरकारसमोर मांडले गेले आणि सरकार ऐकत नाही, म्हणून आम्ही ते कोर्टात ते मांडले. यामध्ये कोर्टातील अनेक निर्णय हे सरकारच्या विरोधातच आले. हे कोर्टात केसेस टाकणारे पण लोक पाहिजेत, हे एक फार चांगले काम आहे. यामुळे राजकीय लोकांना शिस्त लागते. त्यामुळे मला सातत्याने वाटत की काहीही झाले की, टाक केस, असे लोक पाहिजे." यावेळी त्यांनी कुशल संघटक म्हणून ज्या रवींद्र फडणवीस यांना पुरस्कार देण्यात आला, त्यांचाही उल्लेख केला. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील सरकारच्या अनेक चुकीच्या निर्णयाविरोधात न्यायालयांमध्ये अनेक केसेस टाकल्या. सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. याबाबत त्यांनी रवींद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
"जे कोर्टाच्या आदेशाने होते, ते मंत्रीसुद्धा करू शकत नाही. कारण त्यामुळे राजकारण आडवे येते. कारण न्यायालयातील आदेशानेच जी कामे होऊ शकतात. कित्येक वेळा ती कामे सरकारचे मंत्रीसुद्धा करू शकत नाही. राजकारणी आणि मंत्र्यांना लोकप्रिय राजकारण आडवं येत, असेही यावेळी गडकरी म्हणाले.
हेही वाचा