ताज्या बातम्या

Nitin Gadkari : नितीन गडकरी यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

नितीन गडकरी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

नितीन गडकरी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. नितीन गडकरी म्हणाले की, मला आपल्या सगळ्यांना आवाहन करायचे आहे. लोकशाहीचा उत्सव आपण यानिमित्ताने साजरा करत आहोत.

यासोबतच नितीन गडकरी पुढे म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने मतदान करणं हे त्याचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. सगळ्यांनी मतदान करावं. कुणाला द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. पण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे.

निश्चितपणे यावेळी नागपूरमध्ये जवळपास 75 टक्के मतदान करण्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये प्रयत्न केला आहे. मला विश्वास आहे की, निश्चितपणे मतदान चांगले होईल आणि या निवडणुकीत मी रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने विजयी होईन. असं नितीन गडकरी म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

ITR Filing Extension : करदात्यांना दिलासा; आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ

Beed Rain Update : बीडमध्ये पावसाचा कहर; आज शाळांना सुट्टी जाहीर

Latest Marathi News Update live : काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या भेटीला

Government Websites : सरकारी संकेतस्थळे आता मराठीत होणार