Nitish Kumar Oath Ceremony 
ताज्या बातम्या

Nitish Kumar Oath Ceremony : बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळविलेल्या एनडीए सरकारचा आज शपथविधी

बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळविलेल्या एनडीए सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nitish Kumar Oath Ceremony) बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळविलेल्या एनडीए सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महाराष्ट्र तसेच इतर राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. नव्या मंत्रिमंडळात सहा आमदारांमागे एक मंत्री असे सूत्र ठेवण्यात आले आहे.

सोहळ्याची निमंत्रणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली असून यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहतील. शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी आज सकाळी 11.30 वाजता पाटण्यातील भव्य गांधी मैदानात होत आहे. नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री आणि 20 मंत्री असतील.

Summery

  • बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळविलेल्या एनडीए सरकारचा आज शपथविधी

  • शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

  • नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा