nana patole sameer wankhede Team Lokshahi
ताज्या बातम्या

Nana Patole | 'वानखेडेंवर कोणतीही कारवाई होणार नाही'

नाना पटोले यांची प्रतिक्रिया

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज (Drugs on Cordelia Cruise) पार्टीप्रकरणात आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेला आर्यन खान (Aryan Khan) याला अंमली पदार्थ नियंत्रण विभागकडून (NCB) क्लीनचीट देण्यात आली आहे. मात्र, या केसचे तपास अधिकारी एनसीबीचे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. वानखेडेंविरोधात चौकशी करण्याचा आदेश केंद्र सरकारने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला दिला असल्याचे समजते आहे. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वानखेडेंवर कोणतीही कारवाई होणार नाही, असे म्हंटले आहे.

आर्यन खान यांच्या सुटकेनंतर समीर वानखेडे यांच्यावर करवाई होणार का, यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रीय तपास संस्थांचे जे काम सुरू आहे त्यावर मी वारंवार भूमिका मांडलेली आहे. वानखेडेंवर कोणतीही कारवाई होणार नाही. कारण तो तपास यंत्रणेतील पोपट होता.

काय आहे प्रकरण?

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यात शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. परंतु, आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नव्हते, असे एनसीबीने म्हटले होते. शुक्रवारी अखेर आर्यन खानसह सहा जणांची सबळ पुराव्यांअभावी सुटका करण्यात आली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा