ताज्या बातम्या

मुंबईत कोणत्याही महिलेची हॅटमॅनकडून हत्या नाही, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईत एक घटना घडली आणि त्या घटनेची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. रस्त्याच्या मधोमध एका महिलेवर चाकूनं सपासप वार करुन तिचा खून करण्यात आला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्लेखोर एवढ्यावरच थांबला नाही, तर या घटनेनंतर हल्लेखोराने महिलेचा मृतदेह ओढत फुटपाथवर नेला. असे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.

मुंबईत घडलेल्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला गाडीतून उतरते. त्यानंतर कार महिलेला तिथे सोडून निघून जाते. त्यानंतर तिथे हल्लेखोर येतो आणि महिलेवर चाकूनं सपासप वार करतो. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी होऊन रस्त्यावरच कोसळते. हल्लेखोर तिचे पाय धरुन तिला ओढत रस्त्याच्या पलिकडच्या फुटपाथवर नेतो. ही घटना अंधेरी परिसरातली असल्याचे म्हटले जात आहे.

सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होणाऱ्या हॅटमॅनच्या व्हिडीओची मुंबई पोलिसांकडून दखल घेत एक खुलासा करण्यात आला आहे. मुंबईत कोणत्याही महिलेची हॅटमॅनकडून हत्या झाली नसल्याचं मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप