Anil Parab : 'शवगृहशिवाय कुणाचाच मृतदेह..., रामदास कदमांच्या आरोपावर अनिल परबांचे प्रत्युत्तर  Anil Parab : 'शवगृहशिवाय कुणाचाच मृतदेह..., रामदास कदमांच्या आरोपावर अनिल परबांचे प्रत्युत्तर
ताज्या बातम्या

Anil Parab : 'शवगृहशिवाय कुणाचाच मृतदेह..., रामदास कदमांच्या आरोपावर अनिल परबांचे प्रत्युत्तर

काल पुन्हा रामदास कदमांनी पत्रकार परिषद घेत अनेक नवे खुलासे केले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन कदमांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

Published by : Riddhi Vanne

Anil Parab On Ramdas Kadam Balasheb Thakerya Dead Body Statment : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा 2 ऑक्टोबरला मुंबईतील नेस्को येथे पार पडला. या मेळाव्यामध्ये शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे गटावर घणाघाती आरोप केले. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेबांचा मृत्यूदेह हा दोन दिवस घरात ठेवला होता. त्यांच्या हाताचे ठसे घेतल्याचा धक्कादायक आरोप रामदास कदमांनी केला. यानंतर मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यानंतर काल पुन्हा रामदास कदमांनी पत्रकार परिषद घेत अनेक नवे खुलासे केले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन कदमांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

पत्रकार परिषदेच्यावेळी अनिल परब म्हणाले की, "असं बिल्कुल झालेलं नाही. मी स्वत: यागोष्टी पुन्हा पुन्हा पाहतोय. असा कोणाचा मृत्यदेह मेडिकली ठेवता येतो का? असा कोणाचा मृत्यदेह शवघराशिवाय ठेवता येत नाही. त्यामुळे रामदास कदमांचे आरोप म्हणजे शिळ्या कळीला ओत आणण्यासारखे आहे. त्यांचे अपराध शिशूपालाचे झालेले आहेत. जर उद्धव ठाकरे वाईट होते. तर, 2014 मध्ये तुम्ही मंत्रीपद का घेतलं?. रामदास कदम भिकेंचा कटोरा घेऊन फिरत होते. त्यांच्या निवडणुकीची सुत्र माझ्याकडे होती. मंत्रिपद न मिळाल्याने त्यांची उद्धव ठाकरेबाबत ही भूमिका आहे. "

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा