ताज्या बातम्या

SmartPhone Launching : Nothing च्या CMF ब्रँडकडून भारतात नवीन स्मार्टफोनसह ऑडिओ प्रॉडक्ट्सचे लाँचिंग

कॅमेरा सेटअपमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP टेलीफोटो लेन्स (2x ऑप्टिकल झूमसह), आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स देण्यात आले आहेत.

Published by : Team Lokshahi

कॅमेरा सेटअपमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP टेलीफोटो लेन्स (2x ऑप्टिकल झूमसह), आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स देण्यात आले आहेत. फ्रंट कॅमेरा 16MP आहे. फोनमध्ये मॉड्युलर डिझाइन देण्यात आले असून, यासाठी Universal Cover, Fisheye आणि Macro लेंस, तसेच Wallet/Stand सारख्या अ‍ॅक्सेसरीज लवकरच भारतात उपलब्ध होतील. फोन व्हाइट, ब्लॅक, ऑरेंज आणि लाइट ग्रीन या चार रंगांमध्ये येतो.

किंमत व विक्री

8GB+128GB व्हेरियंटची किंमत 17,999 रुपये असून 8GB+256GB व्हेरियंट 19,999 रुपये मध्ये उपलब्ध होईल. 5 मे रोजी लॉन्च ऑफरअंतर्गत दोन्ही मॉडेल्सवर 1,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. हे प्रॉडक्ट Flipkart, Croma, Vijay Sales व इतर स्टोअर्सवर उपलब्ध होईल. लंडनस्थित टेक कंपनी Nothing च्या उप-ब्रँड CMF ने भारतात चार नव्या प्रॉडक्ट्सची घोषणा केली आहे. यामध्ये एक स्मार्टफोन आणि तीन ऑडिओ डिव्हाइसेसचा समावेश आहे. यामध्ये CMF Phone 2 Pro, आणि CMF Buds 2, Buds 2 Plus, Buds 2a यांचा समावेश आहे.

CMF Phone 2 Pro हा आजवरचा Nothing कडून सादर झालेला सर्वात हलका आणि पातळ स्मार्टफोन आहे. याचे वजन 185 ग्रॅम असून जाडी फक्त 7.8 मिमी आहे. IP54 वॉटर रेझिस्टन्स, अ‍ॅल्युमिनियम कॅमेरा रिंग, आणि स्टेनलेस स्टील स्क्रूज यासह उत्कृष्ट डिझाइनमध्ये हा फोन तयार करण्यात आला आहे.

या फोनमध्ये 6.77-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले असून, यामध्ये 3000 निट्स पीक ब्राइटनेस आणि 120Hz अ‍ॅडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट आहे. MediaTek Dimensity 7300 Pro 5G प्रोसेसरसह, 5,000mAh बॅटरी दिली आहे, जी एका चार्जवर दोन दिवस टिकते, असा कंपनीचा दावा आहे. ही ऑडिओ प्रॉडक्ट्स मालिका लवकरच भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

CMF Buds मालिका

Buds 2a (2,199 रुपये)

42dB ANC, 12.4 मिमी बायो-फायबर ड्रायव्हर्स, एंट्री लेव्हल वापरासाठी.

Buds 2 (2,699 रुपये)

दररोजच्या वापरासाठी योग्य; 48dB ANC, Spatial Audio Effect, Dirac Opteo ट्यूनिंग.

Buds 2 Plus (3,299 रुपये)

प्रीमियम अनुभवासाठी; Hi-Res LDAC ऑडिओ, हिअरिंग कंपेन्सेशन, आणि EQ कस्टमायझेशन.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा