ताज्या बातम्या

आता सरकार सर्व टोलनाके बंद करणार, हायटेक पद्धत वापरणार

Published by : Siddhi Naringrekar

सरकार सर्व टोलनाके बंद करणार असून हायटेक पद्धत वापरणार असल्याची माहिती मिळत आहे. याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. सरकार कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्वयंचलित पद्धतीने टोल वसुली करणार आहे. सरकारच्या एका अहवालानुसार, समोर आले आहे की, कॅमेऱ्यांच्या माध्यमातून टोलवसुली केल्याने टोल वसुलीचे काम अतिशय गतीने पूर्ण होईल आणि त्यामुळे वाहनांची कोंडीतून सुटका होणार आहे. त्याचवेळी टोलबाबत पारदर्शकताही राहणार आहे. फास्टैगमुळे टोलनाका परिसरातील वाहतूक कोंडी कमी झाली आहे, मात्र टोल गेटवरील वाहतूक कोंडी अद्याप काय आहे. ती कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

वर्ष २०१९ मध्ये सरकारने कंपनीकडून फिट होणाऱ्या नंबर प्लेटबाबत नियम जाहीर केले होते. या कारणामुळे गेल्या ४ वर्षांमध्ये जितकी वाहने रस्त्यांवर आली आहेत, त्यामध्ये कंपनीकडून फिट केलेली नंबर प्लेट लावण्यात आली आहे. आता सरकार टोल नाका काढून टाकत त्याजागी असे कॅमेरे लावणार आहे, , ज्यामुळे या नंबर प्लेटची माहिती घेत वाहनाला जोडले गेलेल्या बँक खात्यातून टोल वसुली करेल. याबाबत प्रायोगिक तत्वावर एक प्रकल्प सुरु असून, लवकरच त्याला देशभरात लागू केले जाऊ शकते. अशी माहिती नितिन गडकरी यांनी दिली आहे.

देशातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी २०२५ पर्यंत १.८ लाख किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे, तर याच दरम्यान रेल्वे मार्गही १.२ लाख किलोमीटरपर्यंत जाईल, असे बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज इंडियाच्या अहवालात म्हटले आहे. या योजनेला लागू करण्यास एक समस्या आहे. कॅमेयाच्या माध्यामातून टोल वसुली करताना जर एखाद्याने टोल दिला नाही तर त्याला दंड किती लागेल याबाबत कायद्यात काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही योजना सुरू करण्यापूर्वी दंडाची तरतूद असणारा कायदा तयार करावा लागणार आहे. असेही गडकरी यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महाविकास आघाडीतील सांगलीच्या वादावर रोहित पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य