Nariyali Bhat (Sweet Coconut Rice) : आता बनवा नारळी पौर्णिमा स्पेशल 'नारळीभात' Nariyali Bhat (Sweet Coconut Rice) : आता बनवा नारळी पौर्णिमा स्पेशल 'नारळीभात'
ताज्या बातम्या

Nariyali Bhat (Sweet Coconut Rice) : आता बनवा नारळी पौर्णिमा स्पेशल 'नारळीभात'

नारळी पौर्णिमा स्पेशल: नारळी भाताची सोपी रेसिपी, गोडवा आणि सुगंधाचा आनंद घ्या.

Published by : Riddhi Vanne

Nariyali Bhat (Sweet Coconut Rice) : नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे काही तासांवर येऊन ठेपले आहे. अशावेळी कुटूंब एकत्र येते. आता सगळे एकत्र येणार म्हणजे जेवणाचा बेतही एकदम खास बनवला जातो. जेवणांमध्ये काहीतरी गोड पदार्थ लागतोच. नारळी पौर्णिमेला बनवला जाणारा पदार्थ म्हणजे नारळी भात. आता जाणून नारळी भाताची रेसिपी

नारळी भात रेसिपी

साहित्य

२ टेबलस्पून तूप

३ ते ४ लवंगा, २- ३ हिरव्या वेलची, दालचिनीचा छोटा तुकडा

१ कप खोवलेलं नारळ

१ कप साखर

१ कप तांदूळ घेऊन शिजवलेला भात

१० ते १२ केशराच्या काड्या

अर्धी वाटी दूध

काजू- बदामचे काप आणि मनुका असा सुकामेवा अर्धा कप.

रेसिपी

सगळ्यात आधी कढईमध्ये २ टेबलस्पून तूप टाका. तूप गरम झालं की त्यात लवंगा, वेलची, दालचिनी टाकून ते परतून घ्या. हे पदार्थ परतून झाले की त्यात खोवलेलं नारळं टाका आणि ३ ते ४ मिनिटे परतून घ्या. नंतर साखर टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यात बदाम आणि काजूचे काप तसेच मनुका टाका. आता त्यात शिजवलेला भात टाका.

त्यावर केशराचं दूध घाला. १० ते १२ केशराच्या काड्या दुधात भिजवून हे दूध तयार करून घ्यावं. हलक्या हाताने सगळं मिश्रण हलवा. भाताची शितं मोडणार नाहीत, याची काळजी घ्या. कढईवर झाकण ठेवा, ५ ते ७ मिनिटे कमी गॅसवर वाफ येऊ द्या. मस्त सुगंधित, उत्तम चवीचा आणि मोकळा- मोकळा नारळी भात झाला तयार.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Air Force Chief On Operation Sindoor : 'ते' क्षेपणास्त्र ठरले “गेमचेंजर”! 80 तासांच्या युद्धात पाकिस्तानला दिला सणसणीत जवाब! वायुसेना प्रमुखांचा खुलासा

Latest Marathi News Update live : नागपूर -पुणे 'वंदे भारत'चं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा बदल? पाच वर्षांच्या हमीसह हप्ता देखील होणार दुप्पट; फडणवीसांनी दिले संकेत

Mohammed Siraj : ...अन् सिराजने रुमर्सची बोलतीच बंद केली! थेट तिच्याकडूनच राखी बांधून घेतली जिच्यासोबत अफेअरच्या चर्चांना आलेलं उधाण