ताज्या बातम्या

राज्यपाल नियुक्त 7 आमदारांची शपथविधी, 'या' आमदारांनी घेतली शपथ

विधानसभा निवडणुकीचीआचारसंहित लागू होण्याआधी महायुतीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे.

Published by : shweta walge

विधानसभा निवडणुकीचीआचारसंहित लागू होण्याआधी महायुतीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्यपाल नियुक्त १२ पैकी ७ नावांवर सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राज्यपाल नामनियुक्त सात विधान परिषद सदस्यांचा शपथविधी पार पडला.

राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महायुतीकडून 7 नावं समोर आली आहेत. भाजपकडून भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, भाजप पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड ही नावं समोर आली आहेत. तर यांना भाजपकडून संधी देण्यात आली असून यांचा आजच शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांचं नाव असल्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी या नावांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शिफारस करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा