महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यातच काल भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून राजभवनात जाऊन शपथ घेतली. कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष अधिवेशनात आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असून राज्यपालांच्या दोन्ही सभागृहातील अभिभाषणाने अधिवेशनाची सांगता होणार आहे.
याचपार्श्वभूमीवर नवनिर्वाचीत काही आमदारांचा शपथविधी झाला असून दुसरीकडे विरोधक हे ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करत आहेत. विरोधी पक्षांचे आमदार विधानभवनातून बाहेर पडले असून विरोधी पक्षातील आमदारांनी सभात्याग केला आणि ईव्हीएमचा निषेध म्हणून आज विरोधक शपथ घेणार नाही आहेत. तर महायुतीकडून आतापर्यंत काही आमदारांनी विधानसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतली आहे.
विधानसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतलेले नवनिर्वाचीत आमदार
देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे
अजित पवार
दिलीप वळसे पाटील
राहुल नार्वेकर
नरहरी झिरवळ
छगन भूजबळ
गिरिश महाजन
हसन मुश्रीफ
गणेश नाईक
बबनराव लोणीकर
दादा भुसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
उदय सामंत
दिपक केसरकर
शंभूराज देसाई
सुभाष देशमुख
संजय केळकर
मंगेश कुडाळकर
राजेश शिरसागर
नरेंद्र भोंडेकर
भानुदास कर्डीले
बाबासाहेब पाटील
चंद्रदिप नरके
प्रदिप जैस्वाल
कुमार ऐरानी
प्रताप चिखलेकर
दिलीप बोरसे
संजय शिरसाट
हरिश पिंपरे
प्रशांत ठाकुर
जयकुमार रावल
माणिकराव कोकाडे
आशिष जैस्वाल
चंद्रकांत पाटील
धनंजय मुंडे
आदिती तटकरे
संजय भनसोडे
प्रकाश सोळंके
सरोज अहिरे
मंजुळा गावित
विद्या ठाकुर
योगेश साबर
राणाजगजितसिंह पाटील
अर्जुन खोतकर
अनिल पाटील
अतुल सावेयांनी
रविंद्र चव्हाण
धर्मरावबाबा आत्राम
भरत गोगावले
मंदा म्हात्रे
मनिषा चौधरी
सीमा अहिरे
सुलभा गायकवाड
रंजना जाधव
स्नेहा दुबे
सना मलिक
दौलत दरोडा
विजय शिवतारे
दत्तात्रे भरणे
राजेंद्र पाटील
देवयानी फरांदे
मोनिका राजळे
श्वेता महाले
नमिका मुंदडा
मेघना साकोरे बोर्डीकर
अनुराधा चव्हाण
श्रीजया चव्हाण
सई डहाके
किसन पथोरे
शिवेंद्रसिंहराजे भोसले
अबू आझमी
बालाजी किणीकर
जयकुमार गोरे
काशिराम पावरा