Kalyan Police team lokshahi
ताज्या बातम्या

अमृत महोत्सवानिमित्त कल्याण पोलिसांकडून नागरिकांना मिळाली दीड कोटींची अनोखी भेट

अमृत महोत्सवी वर्षाची अनोखी भेट

Published by : Shubham Tate

Kalyan Police : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून कल्याण डोंबिवलीतील पोलिसांनी विविध गुन्ह्यात चोरीस गेलेल्या दागिने आणि ऐवज मिळून दीड कोटींचा मुद्देमाल नागरिकांना परत करत अमृत महोत्सवी वर्षाची अनोखी भेट दिली आहे. कल्याण डोंबिवली हद्दीतील आठ पोलिस ठाण्यात विविध गुन्हे घडले आहेत. या गुन्ह्याची उकल करताना पोलिसांना मोठय़ा प्रमाणात यश आले. (occasion of Amrit Mahotsav, Kalyan Police received a unique gift worth 1.5 crores to the citizens)

अनेक आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. कल्याणचे अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे,पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील आणि सुनिल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पोलिस ठाण्यातील विशेष पथक विविध गुन्ह्यांचा तपास करीत असताना मोठय़ा प्रमाणात चोरी गेलेला ऐवज आणि दागिने पोलिसांनी हस्तगत केले. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्याचे औचित्य साधून कल्याण पोलिस परिमंडळ तीन अंतर्गत नागरिकांना दीड कोटींचे दागिने आणि ऐवज परत करण्यात आला आहे.

अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि दोन्ही सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या उपस्थीत कल्याण पश्चीमेतील वायलेनगर साई सभागृहात कार्यक्रमा दरम्यान हे सर्व साहित्य नागरीकांना देण्यात आले. चोरीस गेलाल माल पुन्हा नागरिकांना मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. अनेक नागरिकांनी पोलिसांचे जाहिरपणे कौतूक करत आभार मानले. या कार्यक्रमात शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनिल वायले यांचा पोलिसांनी विशेष सत्कार केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा