ताज्या बातम्या

जागतिक महिला दिनानिमित्त भिले ग्रामपंचायतीकडून विधवा महिलांचा सन्मान

Published by : Sagar Pradhan

निसार शेख|रत्नागिरी: भिले ग्रामपंचायतमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त संरपच आदिती अविनाश गुडेकर यांच्या उपस्थितीत हळदीकुंकू समारंभ सांस्कृतिक कार्यक्रमात विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यामुळे विधवा महिलांनी सरपंच आदिती अविनाश गुडेकर यांचे मनापासून कौतुक केले.

यावेळी संरपच आदिती अविनाश गुडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात गावातील बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. तर, उपसंरपच उमेश सकपाळ माजी सरपंच धनंजय केतकर, सिआरपी स्नैहल सुतार आरोग्य सेविका ममता मांडवे यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य मंगेश भुवड, श्रावणी गुरव,विद्या सकपाळ,शामल निगडे मुख्याध्यापक स्नेहा शिंगडे माजी ग्रामसेवीका प्रमिला सुर्यवंशी कृषी सहायक सौ नलावडे ,माजी ग्रामपंचायत सदस्य सौ सुकेशनी सकपाळ पंप ऑपरेटर रुपेश गुडेकर ग्रामरोजगार सेवक निलीमा सकपाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक सौ अरूणा राठोड यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसंघाच्या अध्यक्ष शितल सुतार, उपाध्यक्ष शितल गुडेकर ,सचिव अक्षता तलगे, लिपीका अक्षया भुवड श्रीमती वंजयती गुडेकर, अर्चना सकपाळ, करुना जाधव, सुवर्णा कदम शारदा गुडेकर, रीया दिविलकर, रुपाली गुडेकर, सुषमा चांदीवडे, शुभांगी भुवड, समृध्दी लींबे, वंदना कदम, प्रणाली नवेले, अरूणा हांतकाबकर, सुगंधा दिवेकर व ओवी गुडेकर यांनी परिश्रम घेतले.

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ

Wedding Rituals: हिंदू धर्मात लग्नाच्या वेळेस का केली जाते सप्तपदी? जाणून घ्या कारण...

Wedding Rituals: लग्नात का चोरतात नवरदेवाचे बूट? रंजक आहे यामागचं कारण