ताज्या बातम्या

बाळासाहेब थोरातांच्या बैठकीला अधिकारी अनुपस्थित, थोरात संतापले

संगमनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरच्या प्रांत कार्यालयात आढावा बैठक

Published by : shweta walge

संगमनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरच्या प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली. मात्र या बैठकीला प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे अनुपस्थित राहिल्याने आमदार थोरात यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती पुन्हा एकदा निशाणा साधला.

थोरात म्हणाले, आम्हीही मंत्री राहिलो, महसूल मंत्री राहिलो, मात्र कधी शिर्डीचे प्रांताधिकारी, तहसीलदार यांना घेऊन बसलो नाही एवढी महत्त्वाची तालुक्यात वर्षातली एक टंचाई आढावा बैठक असताना देखील महसूलमंत्र्यांकडे प्रांतअधिकारी, तहसीलदार, बैठकीला जातात खेदाची बाब आहे. असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

दरम्यान, संगमनेर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने बाजरी, सोयाबीन, मका, कापुस, भुईमूग हे पिके पुर्णपणे जळाली. तसेच तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना चारा सुध्दा शिल्लक राहिला नसून, शेतकरी हवालदिल झाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा