Admin
ताज्या बातम्या

जुन्या पुणे मुंबई महामार्गाचा टोल महागला; एवढे पैसे मोजावे लागणार

मुंबई पुणे एक्सप्रेस प्रवास महागणार असून 1 एप्रिलपासून टोल दरात वाढ होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई पुणे एक्सप्रेस प्रवास महागणार असून 1 एप्रिलपासून टोल दरात वाढ होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून ही टोल दरवाढ करण्यात येणार आहे. मुंबई एक्स्प्रेस वेसाठीसुद्धा वाहनांना जास्तीचा टोल भरावा लागू शकतो. 1 एप्रिल 2023 पासून नवे दर लागू होणार असल्यानं प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.

त्यातच आता मुंबई-पुणे जुन्या मार्गावरील प्रवासासाठीदेखील जास्त पैसे मोजावे लागणार आहे. आता जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील टोल मध्ये तब्बल 18 टक्क्यांने वाढ होणार आहे.

वाहन जुने नवे

कार 135 156

हलके वाहन 240 277

ट्रक/बस 476 551

अवजड वाहन 1023 1184

स्थानिक लोकांना

वाहन जुने नवे

कार 41 47

हलके वाहन 72 83

ट्रक/बस 143 165

अवजड वाहन 307 355

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा