ताज्या बातम्या

Omraje Nimbalkar : खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले, डम्पर अंगावर येताच...

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गोवर्धनवाडी येथे गेले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव डम्परचा त्यांना आवाज आला. खासदार निंबाळकर यांनी पाठीमागे वळून पाहिले डम्पर मोठ्या वेगाने त्यांच्या दिशेने येत होता. भरधाव डम्पर अंगावर येताच त्यांनी प्रसंगावधान राखत उडी मारली, त्यामुळे ते बचावले आहेत.

या प्रकारावरुन आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.घटनेनंतर पोलिसांनी भरधाव डम्परचा पाठलाग करत चालकाला ताब्यात घेतलं. आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मी सुखरूप असल्याची प्रतिक्रिया या अपघातानंतर ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणात टिप्पर चालकाविरोधात कलम 279, 336, 184 अन्वये ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. असे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा