ताज्या बातम्या

OBC Reservation : ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘ओबीसीं’चा एल्गार; सभेआधीच जरांगेंचा वार

राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्याच निर्णय घेतल्यानंतर राज्यात मराठा आणि ओबीसी (OBC Reservation) संघर्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘ओबीसीं’चा एल्गार

  • ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात येणार

  • राज्यातील सर्वच ओबीसी नेते या सभेला उपस्थित राहणार

राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्याच निर्णय घेतल्यानंतर राज्यात मराठा आणि ओबीसी (OBC Reservation) संघर्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात ओबीसींनी आज बीडमध्ये एल्गार पुकारलायं. याआधीची सभा रद्द करुन आज बीडमध्ये ही जाहीर सभा पार पडणार आहे. राज्यातील सर्वच ओबीसी नेते या सभेला उपस्थित राहणार असून एक प्रकारे ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.

या एल्गारला मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार असून या सभेत भुजबळ काय बोलणार? याकडं लक्ष लागलेलं असतानात मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार वार केलायं. छगन भुजबळ मराठा समाजाविरोधात षडयंत्र रचत असून अलिबाबाच्या षडयंत्रात ओबीसी नेते अडकले आहेत, त्यांनी आता माकडचाळे बंद करावेत. अलिबाबा अजित पवारांवर दबाव आणतो, हैदराबाद गॅझेटच्या जीआर आड लपतो, मराठा आरक्षणाला विरोध करतो, या शब्दाांत तिखट टीका मनोज जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर केलीयं.

काही दिवसांपूर्वीच बीडमध्ये पार पडलेल्या दसरा मेळाव्यातून आमदार धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली होती. कोण कोणाला फसवतं, ओबीसींंच्या ताटातलं आरक्षण कोणाला दिलं जाऊ नये, असं धनंजय मुंडे म्हणाले होते. त्यानंतर आता आज पुन्हा ओबीसी समाजाची सभा पार पडणार आहे. या सभेला राज्यातील ओबीसी नेते आमदार गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह सर्वच नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सभेतून ओबीसी नेते मनोज जरांगेंना काय प्रत्युत्तर देणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा