ताज्या बातम्या

India Pakistan War : 'बोलायचं नसतं, थेट Action घ्यायची'; शरद पवारांचं सूचक वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सर्वेसर्वा आणि देशाचे जुने जाणते ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सध्या सुरू असलेल्या भारत-पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीवर भाष्य करताना सूचक वक्यव्य केलं आहे.

Published by : Rashmi Mane

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सर्वेसर्वा आणि देशाचे जुने जाणते ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सध्या सुरू असलेल्या भारत-पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीवर भाष्य करताना सूचक वक्यव्य केलं आहे. त्यांनी अगदी एका शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. पाकिस्तानकडून सध्या भारतावर विविध ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ले सुरू आहेत. मात्र भारतही संपूर्ण ताकदीने हे हल्ले परतवून लावत आहेत. अशा परिस्थिती सत्ताधाऱ्यांपासून विरोध पक्षापर्यंत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. या कठिण प्रसंगी सर्व राजकीय पक्ष सरकारच्या पाठीशी असून देशात एकजूट असल्याच्या भावना व्यक्त करत आहेत. दरम्यान, शरद पवार यांनीही युद्ध परिस्थितीला उद्देशून बोलायचं नसतं, अॅक्शन घ्यायची, असे सूचक वक्तव्य केले. शरद पवार हे महाराष्ट्रासह केंद्रातही महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांनी केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री तसेच संरक्षण मंत्री म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. देशाचे माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारमध्ये शरद पवार यांनी संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा