Indian Railway : दिवाळी आणि छटपूजेसाठी मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वे सज्ज, जादा गाड्या सोडणार Indian Railway : दिवाळी आणि छटपूजेसाठी मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वे सज्ज, जादा गाड्या सोडणार
ताज्या बातम्या

Indian Railway : दिवाळी आणि छटपूजेसाठी मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वे सज्ज, जादा गाड्या सोडणार

दिवाळी आणि छठ पूजेच्यानिमित्ताने 1998 विशेष फेऱ्या (आरक्षित + बिनआरक्षित) 19 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या काळात चालवल्या जात आहेत.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • दिवाळी आणि छठ पूजेच्या निमित्ताने विशेष ट्रेनचं आयोजन

  • भारतीय रेल्वेने एकूण 12 हजार 11 विशेष गाड्या चालवल्या..

भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. सणासुदीला गावी जाणाऱ्या नागरिकांनासाठी दिलासदायक बातमी समोर आली आहे. दिवाळी आणि छठ पूजेच्यानिमित्ताने 1998 विशेष फेऱ्या (आरक्षित + बिनआरक्षित) 19 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या काळात चालवल्या जात आहेत. त्यापैंकी 600 पेक्षा जास्त गाड्या मुंबई विभागातून सुटणार आहेत. नियमित दररोज 100 + 8-10 विशेष गाड्यांचे संचालन मुंबईतून केले जात आहे.

कार्यवाही स्थिती (As on 21 Oct 2025):

एकूण नियोजित फेऱ्या: 1998

पूर्ण झालेल्या फेऱ्या: 705

शिल्लक फेऱ्या: 1293

आतापर्यंत प्रवास केलेले प्रवासी: 10.68 लाख

एकूण अंदाजित प्रवासी संख्या: 30.68 लाख

राज्यनिहाय आकडेवारी:

राज्य एकूण फेऱ्या प्रवासी संख्या

बिहार 464 7,25,394

उत्तर प्रदेश 470 8,03,898

महाराष्ट्र 505 6,04,651

राजस्थान 88 1,60,743

दिल्ली 92 1,42,769

बिहार आणि उत्तर प्रदेश मिळून एकूण प्रवाशांच्या 58% हिस्सा घेतात. महाराष्ट्रातील विशेष गाड्या राज्यांतर्गत प्रवास सुलभ करतात. राजस्थान आणि दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत असून मुख्य सुटणारे स्थानक पाहूयात आपण

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT

LTT,

दादर

पुणे

नागपूर

भुसावळ

सोलापूर

दररोज 15 पेक्षा जास्त विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. 26 ऑक्टोबरला विशेष गाड्यांची संख्या 24 वर पोहोचणार. पुढील तीन दिवसांत 77 विशेष गाड्या, त्यापैकी 24 मुंबईतून सुटणाऱ्या. आजपर्यंत 3 गाड्या सुटल्या (दानापूर, मुझफ्फरपूर, गोरखपूर) आणि आणखी 2 गोरखपूर व वाराणसीकडे जाणार. प्रवासी सोयीसाठी उपाययोजना तसेच अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी असणार आहेत.

CSMT – 90

LTT – 70

दादर – 47

कल्याण – 66

60 अतिरिक्त कर्मचारी बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी एस्कॉर्ट ड्युटीवर

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा