यंदा श्रावण महिना 25 जुलै 2025 पासून सुरू होत असून 23 ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. या कालावधीत एकूण चार श्रावणी सोमवार असणार आहेत. हे सोमवार शिवभक्तांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जातात. अनेक भाविक या कालावधीत उपवास करतात, शिवमंदिरांना भेट देतात आणि विविध पूजाविधी करतात. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा अत्यंत धार्मिक महत्त्व असलेला महिना मानला जातो. श्रावण सोमवारानिमित्त आपल्या प्रियजनांना तसेच मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना द्या या शुभेच्छा...
कैलासराणा शिवचंद्रमौळी ।
फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ॥
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
एक पुष्प, एक बेलपत्र, एक तांब्या पाण्याची धार।
भोळे शिवप्रभू करतील सर्वांचा उद्धार,
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा।
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
शंकराला प्रिय आहे बेलपत्र
श्रावणात भक्ती करतात भक्त
कृपा महादेवाची सर्वत्र
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
भोलेबाबाच्या भक्तीत रमते मन
शिवाच्या चरणी भक्ती अर्पण
करतो आराधना महादेवाची
हरपून तन मन धन
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
दुख, दारिद्र्य नष्ट होवो,
सुख समृद्धी दारी येवो,
या श्रावण सोमवारच्या,
शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो,
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!