रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला. राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या गटानं जयंतीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक केली. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तब्बल ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५१ वर्षीय व्यक्तीवर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्याना त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू कशामुळे झाला याची अजून माहिती मिळालेली नाही आहे.