ताज्या बातम्या

Cash Pay On Petrol Pump : डिजिटल पेमेंटवर 'या' जिल्ह्यात बंदी; Petrol Pump वर बाळगा Cash; वाचा कधीपासून होणार अंमलबजावणी

नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शनिवार, 10 मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही.

Published by : Rashmi Mane

नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शनिवार, 10 मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातील रक्कम गोठवली जात असल्याने विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत देशभरात डिझिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यातील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे. काही प्रकरणांमध्ये तर संपूर्ण बँक खातीच गोठवण्यात आली आहेत. संबंधित खात्यातील रक्कम गृहमंत्रालयाच्या आदेशाशिवाय परत मिळवता येत नाही. ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून, सायबर क्राइम विभागाकडे तक्रार देऊनही अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या समस्येचे लवकरात लवकर समाधान झाले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल पेमेंट बंद करण्याचा विचार संघटना करत आहे.

विदर्भ पेट्रोल पंप असोसिएशनने डिजिटल पेमेंट बंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचा ग्राहकांवर परिणाम होणार, हे निश्चित आहे. डिजिटल इंडियासाठी आग्रही असलेल्या सरकारकडून या निर्णयासंबंधी कोणती भूमिका घेतली जाते, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गौरव जैस्वाल यांच्या नेतृत्वात हे निर्णय घेण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रगती कराल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी

Beed Rain : बीडमध्ये पावसाचा हाहाकार! सहा गावांमध्ये 44 जण अडकले, बचाव मोहिमेसाठी...