OpenAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सॅम ऑल्टमन यांनी ChatGPT वापरणाऱ्या लोकांना एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, ChatGPT वर खूप जास्त विश्वास ठेवू नका, कारण हे तंत्रज्ञान कधी कधी चुकीची किंवा गोंधळात टाकणारी माहिती देऊ शकते. OpenAI च्या अधिकृत पॉडकास्टच्या पहिल्या भागात बोलताना ऑल्टमन म्हणाले, “लोक ChatGPT वर खूप विश्वास ठेवतात, पण AI कधी कधी चुकीची माहिती तयार करतो. त्यामुळे या तंत्रज्ञानावर फारसा विश्वास ठेवू नका.”
“ChatGPT अजूनही संपूर्णपणे विश्वासार्ह नाही” असं ऑल्टमन यांनी सांगितले की, ChatGPT मध्ये नवनवीन फीचर्स जरी आले असले, तरीही हे अजूनही पूर्णपणे विश्वासार्ह नाही. ते म्हणाले, “हे तंत्रज्ञान अजूनही खूप अचूक नाही आणि हे आपण प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे.” ChatGPT मध्ये अलीकडेच Persistent Memory आणि जाहिरात-आधारित मॉडेल (Ad-supported) हे नवीन फीचर्स आले आहेत.
या बदलांमुळे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेबाबत नवीन चिंता निर्माण झाल्या आहेत, असं ऑल्टमन यांनी स्पष्ट केलं. OpenAI सध्या The New York Times यासारख्या मोठ्या मीडिया संस्थांच्या कॉपीराइट संदर्भातील खटल्यांचा सामना करत आहे. या प्रकरणावर बोलताना ऑल्टमन म्हणाले, “आम्ही पारदर्शक आहोत आणि वापरकर्त्यांशी प्रामाणिक राहणं हे आमचं कर्तव्य आहे.”
हार्डवेअरबाबत मत बदल -
पूर्वी ऑल्टमन यांनी म्हटलं होतं की, AI साठी नवीन हार्डवेअरची गरज नाही. मात्र आता त्यांनी भूमिका बदलली असून ते म्हणाले,“सध्याचे संगणक AI शिवायच्या जगासाठी बनवले गेले होते. पुढे जाऊन AI साठी वेगळ्या प्रकारचं हार्डवेअर लागणार आहे.” ते त्यांच्या भाऊ जॅक ऑल्टमन यांच्या पॉडकास्टमध्ये बोलत होते. त्यांनी सांगितले की, भविष्यातील AI प्रणाली वापरकर्त्याच्या आयुष्यातील गोष्टी समजून घेतील आणि अधिक सुसंगत होतील.