ताज्या बातम्या

China Reaction On Operation Sindoor: 'सद्यस्थितीबाबत आम्ही...' भारताच्या एअर स्ट्राईकनंतर चीनची प्रतिक्रिया

भारतीय सैन्यदलानं (Indian Army) पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भारतीय सैन्यदलानं (Indian Army) पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. भारताविरोधात दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.

भारताकडून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor ) अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याच्या 15 दिवसांनी ही कारवाई केली.

याच पार्श्वभूमीवर चीनने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, 'आज सकाळी भारताने केलेली लष्करी कारवाई चीनला खेदजनक वाटते. सध्याच्या परिस्थितीबद्दल आम्हाला चिंता आहे. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी आहेत आणि नेहमीच राहतील. ते दोघेही चीनचे शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. आम्ही दोन्ही बाजूंना शांतता आणि स्थिरतेच्या व्यापक हितासाठी शांत राहण्याचे, संयम बाळगण्याचे आणि परिस्थिती आणखी गुंतागुंतीची करू शकेल अशा कृती करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन करतो.'

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा