ताज्या बातम्या

Operation Sindoor : भारतीय लष्कराला मोठं यश; लष्कर - ए - तोयबाच्या दोन कमांडरचा खात्मा

भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली.

याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. भारताविरोधात दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.

या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या या दोन्हीही दहशतवादी मुख्यालयांवर कारवाई करण्यात आली. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबाचे दोन कमांडर ठार झाले असून मुदस्सीर आणि हाफीज अब्दुल मलिक अशी त्या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना पदोन्नती किंवा आर्थिक लाभ होईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला