ताज्या बातम्या

Operation Sindoor: वंदे मातरम्! भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, पहिला PHOTO आला समोर

भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. भारताविरोधात दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. मध्यरात्री दीड वाजता ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

भारताकडून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor ) अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनी ही कारवाई केली. भारताच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.

भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं.पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हे ऑपरेशन सिंदूर करत होते. या एअर स्ट्राईकचा पहिला फोटो आता समोर आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत