ताज्या बातम्या

Operation Sindoor : Donald Trump : ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. भारताविरोधात दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.

भारताकडून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor ) अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनी ही कारवाई केली.

याच पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘आम्ही त्याबद्दल ऐकले आहे. हे लज्जास्पद आहे. मला आशा आहे की हे लवकरच संपेल. दोन शक्तिशाली देशांना युद्धाच्या मार्गावर जाताना कोणीही पाहू शकत नाही.'

'या दोन्ही देशांमधील इतिहास खूप जुना आहे आणि तणाव शिगेला पोहोचला आहे. पण या जगाला युद्धाची नव्हे तर शांतीची गरज आहे' असंही ट्रम्प म्हणाले

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

UBT Protest : छत्रपती शिवाजी पार्कमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन सुरु; भारत-पाक सामना प्रकरणी संताप

Latest Marathi News Update live : ठाकरेंच्या शिवसेनेचं राजव्यापी आंदोलन

Ajit Pawar : पुण्यातील समस्या सोडवण्यासाठी अजित पवारांचा जनसंवाद; हडपसरमध्ये तीन हजार तक्रारींची नोंद

Ladki Bahin Yojana : सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेत धक्कादायक उघड: दहा हजार महिलांचा ठावठिकाणा नाही