ताज्या बातम्या

Operation Sindoor : आता खरा न्याय झाला..., पाकवरील हवाई हल्ल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

बॉलिवूड प्रतिक्रिया: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकवरील हल्ल्याला कलाकारांचा पाठिंबा, जय हिंदचा जल्लोष.

Published by : Team Lokshahi

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवादांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला. त्यांना धर्म विचारुन त्याच्यावर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना गोळ्या झाडून हत्या केली. या मृतांना न्याय देण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. पाकिस्तानमधील वेगवेगळ्या ठिकाणी 'Operation Sindoor'या मोहिमेद्वारे बुधवारी रात्री 1.30 च्या सुमारास पहलगामच्या हल्ल्यावर प्रत्युत्तर दिले. याचपार्श्वभूमीवर आता बॉलिवूड कलाकारांनी या हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेत्री निम्रत कौरची पोस्ट

आपल्या सैन्याबरोबरच एकजूट आहोत. एक देश, एक ध्येय, #जयहिंद #मिशन सिंदूर

कंगणा रनौतची पोस्ट

कंगना रनौत यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया दिली. कंगनाने इंस्टाग्रामवर पाकिस्तानमधून आलेले दोन व्हिडिओ पोस्ट केले. तिने लिहिले:

"त्यांनी म्हटलं होतं मोदीला सांगून टाका, आणि मोदींनी त्यांना सांगून टाकलं. जे आपल्या संरक्षणासाठी लढतात, ईश्वर त्यांचं रक्षण करो. आपण आपल्या सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो."

अनुपम खेर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. ट्विटरवर त्यांनी लिहिले:

"भारत माता की जय..."

प्रसिद्ध चित्रपट निर्माते मधुर भंडारकर यांनी लिहिले:

"आपल्या प्रार्थना आपल्या सैन्याबरोबर आहेत. एक देश म्हणून आपण एकत्र उभे आहोत. जय हिंद, वंदे मातरम्."

अल्लू अर्जुन यांनी आपल्या ट्विटरवर ‘ऑपरेशन सिंदूर’ची एक छायाचित्र पोस्ट करत लिहिले:

"आता न्याय झाला आहे. जय हिंद..."

अक्षय कुमार यांनी आपल्या इंस्टाग्रामवर ‘ऑपरेशन सिंदूर’चे छायाचित्र शेअर करत लिहिले:

"जय हिंद, जय महाकाल..."

सुनील शेट्टी यांनी आपल्या इंस्टाग्रामवर ‘ऑपरेशन सिंदूर’चे छायाचित्र शेअर केले. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले:

"आतंकासाठी कुठलीही जागा नाही. शून्य सहनशीलता, पूर्ण न्याय."

रजनीकांत यांनी ट्विटरवर लिहिले:

"योध्यांची लढाई सुरू झाली आहे, जोपर्यंत मिशन पूर्ण होत नाही, तोपर्यंत थांबायचं नाही. संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे."

रितेश देशमुख यांनी लिहिले:

"जय हिंदची सेना, भारत माता की जय."

ज्युनियर एनटीआर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले:

"आपल्या भारतीय सेनेच्या सुरक्षितता आणि शक्तीसाठी आपण प्रार्थना करतो. जय हिंद."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा