पाटणा येथे आज विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पार्टी तसंच इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. तर शरद पवार यांच्यासह इतर पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते पाटण्याला पोहोचले आहेत. आज होणाऱ्या या बैठकीची धुरा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांभाळली आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात समविचारी पक्षांना एकत्रित करण्याचा प्रयत्न नितीश कुमार करत आहेत. भाजपविरोधातले 15 पक्ष या बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या बैठकीचे आयोजन केलं आहे.
त्यामुळं हे सर्व विरोधी पक्ष आज पाटण्याच्या मंचावरुन काही घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.