Geeta Jain 
ताज्या बातम्या

Geeta Jain : भाईंदरच्या माजी आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश; कारण काय?

भाईंदरच्या माजी आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...

(Geeta Jain) भाईंदरच्या माजी आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काशीमिरा पोलिसांना भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 352, 353, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला सार्वजनिक ठिकाणी चापट मारल्याच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात माजी आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.

मिरा-भाईंदरच्या आमदार असलेल्या गीता जैन या नगरपालिकेच्या दोन अभियंत्यांवर संतापल्या आणि एका कनिष्ठ अभियंत्याला चापट मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओत जैन या अभियंत्याचा कॉलर धरताना आणि त्याच्यावर आरडाओरड करताना दिसतात. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

Summery

  • भाईंदरच्या माजी आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

  • अभियंत्याला चापट मारल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

  • आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयाने दिला आदेश

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा