सोशल इन्फ्लुएन्सर आणि बॉलीवूडमधील लोकप्रिय वक्तिमत्त्व म्हणजे ऑरी. ऑरी हा बॉलीवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड असल्याचं म्हटल जात. ऑरी हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना पाहायला मिळतो. ऑरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीने चर्चेत येत असतो. असं असताना ओरहान अवत्रामणी हा आता वादात अडकला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील वैष्णोदेवी बेस कॅम्प कटरा येथील एका हॉटेलमध्ये त्याने मद्यपान प्राशन कोल्यामुळे त्याच्या विरोधात आणि त्याच्यासह इतर 8 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कटरामध्ये दारू विकणे, बाळगणे आणि पिणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन करणे असं मानले जाते. त्यामुळे सक्त मनाई असताना मद्यपान प्राशन केल्याप्रकरणी आणि तेथिल कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी ऑरीसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
कटरा परिसरात पवित्र स्थळ आहेत, तेथिल भक्तीमय वातावरण आणि लोकांमधील शांतता भंग होऊ नये यासाठी तेथे काही गोष्टींना बंदी घालण्यात आली आहे. ओरी व त्याचे काही मित्र दर्शन सिंह, पार्थ रैना, रितिक सिंह, राशी दत्ता, रक्षिता भोगल, शगुन कोहली आणि अॅनास्तासीला अरझामास्किना हे वैष्णोदेवी बेस कॅम्प कटरा मॅरियट रिसॉर्ट अँड स्पामध्ये थांबले होते. त्यावेळी त्यांना आधीच तेथिल हॉटेल प्रशासनाने मद्यपान प्राशन आणि मांसाहारी पदार्थांवर बंदी असल्याचं सांगितलं.
तसेच धार्मिक स्थळांवर अमली पदार्थ किंवा दारूचे सेवन करून सामान्य जनतेच्या भावना दुखावणारे कोणतेही कृत्य सहन न केले जाणार नाही असा इशारा देऊन देखील त्यांनी 15 मार्च रोजी दारू प्यायली होती आणि नियम मोडले होते. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. तसेच ऑरीने देखील यादरम्यानचे काही फोटो शेअर केले होते. ज्यात त्याचे मित्र पार्टी करताना दिसत आहेत, तसेच बाजूच्या टेबलवर दारुच्या बाटल्या देखील पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.