ताज्या बातम्या

Netflix : नेटफ्लिक्सचा भारतात 16 हजार कोटींचा नफा ; भारतीय वेबसीरिज निर्मितीला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

व्यवसायिकदृष्ट्याही नेटफ्लिक्सला प्रचंड यश मिळाले आहे.

Published by : Shamal Sawant

नेटफ्लिक्सने भारतात गेल्या काही वर्षांत मोठी घोडदौड केली आहे. देशातील सुमारे 90 शहरांमध्ये चित्रीकरण करत, त्यांनी 150 पेक्षा अधिक भारतीय वेबसीरिज आणि वेबपटांची निर्मिती केली आहे. यामधून केवळ प्रेक्षकांचा प्रतिसादच नाही, तर व्यवसायिकदृष्ट्याही नेटफ्लिक्सला प्रचंड यश मिळाले आहे.

2018 मध्ये प्रदर्शित झालेली 'सेक्रेड गेम्स' ही नेटफ्लिक्सवरील पहिली हिंदी वेबसीरिज भारतात आणि जगभरात प्रचंड गाजली. सैफ अली खान आणि नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेमुळे भारतीय प्रेक्षकांचे लक्ष वेबसीरिजकडे वळले. यानंतर नेटफ्लिक्सने भारतीय कंटेंटवर अधिक भर देण्यास सुरुवात केली.

या यशामुळे भारतातील सर्जनशील क्षेत्रालाही चालना मिळाली आहे. या काळात जवळपास 20 हजार भारतीय कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मितीसंस्थांना रोजगाराची संधी मिळाली. यामुळे भारतीय मनोरंजन उद्योगाच्या वाढीस चालना मिळाल्याचे सारंडोस यांनी स्पष्ट केले.

सैफ अली खानने 'वेव्हज' परिषदेत टेड सारंडोस यांची मुलाखत घेतली. या संवादात सारंडोस यांनी सांगितले की, मागील वर्षभरात जगभरातील प्रेक्षकांनी नेटफ्लिक्सवर भारतीय आशय तब्बल 3 अब्ज तास पाहिला. शिवाय, दर आठवड्याला नेटफ्लिक्सवरील ‘टॉप 10 ’ वेबमालिकांच्या यादीत एखादी भारतीय वेबसीरिज निश्चितपणे असते, हेही त्यांनी नमूद केले.

सारंडोस यांनी असेही सांगितले की, भारतीय निर्माते आणि लेखकांनी त्यांच्या मातीतल्या, स्थानिक संस्कृतीशी निगडित कथांना अधिक प्राधान्य द्यावे. जगभरात प्रेक्षक अशाच आशयाला पसंती देत आहेत. भारतीय कथा आणि लोककथांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे आकर्षण असल्याचे त्यांनी सांगितले. या यशामुळे नेटफ्लिक्सची भारतातील गुंतवणूक आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा