ताज्या बातम्या

Asaduddin Owaisi On Nagpur Voilence : नागपूर दंगलीसाठी मुख्यमंत्री आणि सरकार जबाबदार, ओवैसीकडून गंभीर आरोप

नागपूर हिंसाचारावर असदुद्दीन ओवैसी यांचा गंभीर आरोप, मुख्यमंत्री आणि सरकार जबाबदार. नागपुरमधील दंगलीवर ओवैसींनी व्यक्त केली तीव्र प्रतिक्रिया.

Published by : Prachi Nate

काल नागपुरमध्ये रात्री दोन गटांमध्ये दंगल झालेली पाहायला मिळाली आहे. यावरुन कालपासून अनेक राजकीय पडसाद पडताना दिसले. नागपूर हिंसाचारावर एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. नागपुरमधील हिंसाचार हे सरकारचं अपयश आहे, तर नागपुरमध्ये झालेल्या दंगलीला पुर्णपणे मुख्यमंत्री आणि सरकार जबाबदार आहेत, असं वक्तव्य करत एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नागपूरमध्ये झालेल्या दंगलीवर केलं आहे.

हे सरकार आणि गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे - असदुद्दीन ओवैसी

याचपार्श्वभूमिवर असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, "गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री जी विधाने देत आहेत ती पाहिली पाहिजेत. सरकारकडून सर्वात भडकावणारी विधाने येत आहेत... त्यांना मंत्री आणि मुख्यमंत्री असल्याची जबाबदारीही कळत नाही... संपूर्ण महाराष्ट्रात एका राजाचे पुतळे बनवण्यात आले आणि जाळण्यात आले. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही आणि तुम्ही नाराज झालात, म्हणून त्यांनी कुराणातील आयती लिहिलेल्या कापडाचा तुकडा जाळला. जेव्हा हे घडत होते, तेव्हा हिंदू आणि मुस्लिमांनी डीसीपीकडे तक्रार केली... त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्या हिंसाचारानंतर, मी त्यांचा निषेध करतो... हे सरकार आणि गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे..."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा