Cough Syrup 
ताज्या बातम्या

Cough Syrup : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक

मध्य प्रदेशातील सात सदस्यीय पथकाने केली कारवाई

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • तामिळनाडूतील एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधाच्या नमुन्यांत भेसळ

  • कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक

  • मध्य प्रदेशातील सात सदस्यीय पथकाने केली कारवाई

(Cough Syrup ) मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बालकांचा मृत्यू तामिळनाडूत उत्पादन होणाऱ्या एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधामुळे झाला. तामिळनाडूतील एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधाच्या नमुन्यांत भेसळ आढळून आली असून या औषधावर बंदी घालण्यात आली.

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू, महाराष्ट्रामध्ये याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. राज्यात या घटनेने मोठी खळबळ उडाली. श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीने तयार केलल्या कफ सिरपच्या सेवनामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अनेक मुलांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता हे कफ सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी औषध कंपनी श्रीसन फार्माचे संचालक, बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण सोनी आणि इतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध बीएनएसच्या कलम १०५, २७६ आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायदा १९४०च्या कलम २७अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. चेन्नईतील कोडंबक्कम येथील त्यांच्या अपार्टमेंटमधून कंपनीचे मालक रंगनाथन गोविंदनला अटक करण्यात आली असून मध्य प्रदेशातील सात सदस्यीय पथकाने ही कारवाई केली. रंगनाथनला शोधण्यासाठी पोलिसांनी 20,000 रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते. कंपनीकडून महत्त्वाची कागदपत्रे, औषधांचे नमुने देखील जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा