Admin
ताज्या बातम्या

Atiq Ahmed: गँगस्टर अतिक अहमदला युपी न्यायालयात करणार हजर

गँगस्टर अतिक अहमदला युपी न्यायालयात करणार हजर करण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

गँगस्टर अतिक अहमदला युपी न्यायालयात करणार हजर करण्यात येणार आहे. अतिक अहमदने 2006 मध्ये उमेश पाल यांचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्यामुळे माफिया अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्याविरुद्ध 2007 मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे युपी एसटीएफ आरोपी अतिकला न्यायालयात हजर करण्यासाठी प्रयागराजला घेऊन जात आहे.

अतिकवर नजर ठेवण्यासाठी कारागृहातील कर्मचाऱ्यांची निवड त्यांच्या रेकॉर्डच्या आधारे केली जाणार आहे. अतिक अहमदला रविवारी संध्याकाळी अहमदाबादच्या साबरमती तुरुंगातून युपी पोलिसांनी बाहेर काढले असून ते त्याला प्रयागराजच्या खासदार-आमदार विशेष न्यायालयात नेत आहेत.ताफ्याच्या सुरक्षेसाठी दोन व्हॅनमध्ये 30 सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत. अतिकविरुद्ध सुमारे १०० प्रकरणे सुरू आहेत. त्यापैकी एकात २८ मार्चला शिक्षा सुनावली जाईल. अतीकने २००६ मध्ये उमेश पालचे अपहरण केले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...

Gold Rate Today : देशभरात सोने-चांदीच्या किमतींतील घसरणीला ब्रेक; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या