ताज्या बातम्या

Pahalgam Terrorist Attack : 'माझं नाव भारत, मी हिंदू आहे', असे म्हणताच... ; नेमकं काय घडलं?

पहलगाम दहशतवादी हल्ला: 'माझं नाव भारत, मी हिंदू आहे' म्हणताच भारत भूषण यांचा मृत्यू. तपशील वाचा.

Published by : Team Lokshahi

सुट्टीमध्ये कुठेतरी बाहेर फिरायला जायचा. नेहमीच काय तरी प्लॅन करत असतो. तसाच प्लॅन या कुटुंबाने केला होता. त्यासाठी कामाच्या व्यापातून काहीशी सुट्टी घेऊन हे कुटुंब बाहेर फिरायला आले होते. भारताचे नंदनवन असलेल्या जम्मू- काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते. 22 एप्रिल दुपारच्या सुमारास पहलगाममध्ये भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला.

या हल्लामध्ये एकूण 28 भारतीयांना जीवाला मुकावे लागले. अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाली. त्यातील एक म्हणजे भारत भूषण यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 41 वर्षीय अभियंता भारत भूषण यांचाही मृत्यू झाला. भारत भूषण हे आपल्या पत्नी सुजाता आणि मुलासोबत पहलगाममध्ये फिरायला आले होते. त्याठिकाणी दहशतवादांनी भारतला घेरलं. भारत नाव विचारून त्यावर बेछूट गोळीबार हल्ला करण्यात आला. पत्नी आणि मुलासमोरच भारत मृत्यमुखी पडले.

आपल्या जावयाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या सासूबाईंनी माध्यामांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी आधी भारतला थांबवलं. त्यांना घेरंल. नंतर त्याला 'तुझं नाव काय? तुझं धर्म काय?' असा प्रश्न विचारला तेव्हा भारतन सांगितले, 'माझं नाव भारत आणि मी हिंदू आहे' असं त्यांनी दहशतवादाना उत्तर दिलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी भारतवर गोळ्या मारण्यास सुरुवात केली. भारत जमिनीवर कोसळेपर्यंत त्यांच्यावर गोळीबार करत राहिले.

भारतच्या पत्नीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सुजाताने तिचे आपल्या मुलाचे प्राण वाचवले. त्यावेळस मोबाईल आणि पर्स, मोबाईल आणि मुलाला घेऊन तातडीने तेथून पळ काढला. भारतीय सैन्याने तिला आणि मुलांला तातडीने सुरक्षितस्थळी पोहोचवले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी