जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
यातच आता नवीन माहिती समोर येत आहे ती म्हणजे दहशतवाद्यांनी त्यांची हत्यारं बेताब खोऱ्यात लपवली होती आणि पहलगाम हल्ला लश्कर ए तैयबा, आयएसआय आणि पाकिस्तानचा कट होता असं तपासात समोर आल्याची माहिती मिळत आहे.
यासोबतच हमासने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह 5 फेब्रुवारीला एका रॅलीत भाग घेतला होता. या कार्यक्रमात हमासचे प्रतिनिधी डॉ. खालेद अल-कदौमी यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. पाकव्याप्त काश्मीरमधील रॅलीत हमास सामील झाला असल्याची माहिती मिळत आहे.