जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास 26 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले.
लष्करी गणवेशात असल्याने पर्यटकांना दहशतवादी असल्याचा अंदाज आला नाही. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यात भारतीय नौदलाचे अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही मृत्यू झाला आहे. 26 वर्षीय विनय हरियाणातील कर्नाल येथे राहत होते. अवघ्या 7 दिवसांपूर्वी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर ते पत्नीसोबत काश्मीरला फिरायला गेले होते आणि तेथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात त्यांच्या मृत्यू झाला आहे.