ताज्या बातम्या

Operation Sindoor : पाकिस्तानी हवाई दलाने शेअर केले Fake Video ; PIB ने केली पुष्टी

यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Published by : Shamal Sawant

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला करत बदला घेतला आहे. पहलगाममध्ये 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. केवळ पुरुषांना मारून महिलांना मात्र जीवंत सोडण्यात आले. मात्र आता भारत सरकारने या सगळ्याच बदला घेतला आहे. पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर एअरस्ट्राइक करण्यात आले. यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या हल्ल्याचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहेत.

अशातच पाकिस्तानकडून काही चुकीचे व्हिडीओ व्हायरल केले गेले. पाकिस्तानच्या हवाई दलाकडून श्रीनगर एअरबेसवर हल्ला करण्यात आल्यचा दावा करण्यात आला. मात्र हे सगळे खोटं असल्याचे PIB ने म्हंटलं आहे. पाकिस्तानने जुने व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या हवाई दलाकडून श्रीनगर एअरबेस लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हे व्हिडीओ भारतातील नाहीत असेदेखील स्पष्ट केले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, समोर आलेला व्हिडीओ आणि फोटो 2024 मधील पाकिस्तानच्या खैबर पंख्तुनवा येथील आहे. त्यामुळे अधिकृत माहितीकरिता ही माहिती शेअर केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?