भारताचे जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या एका वक्तव्यानंतर पाकिसातानला इशारा दिला होता. "भारताची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणतीही सीमा ओलांडू शकतो" असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं होत. यावर बोलताना भारताचे जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं होत की, "पाकिस्तानला जगाच्या नकाशावर आपले स्थान कायम ठेवायचे असेल तर त्यांनी दहशतवादाला पाठिंबा देणे तत्काळ थांबवावे".
तसेच ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याला सतर्क राहण्याचे आणि युद्धासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी भारतीय सैन्याला केले. यानंतर आता पाकिस्तानी लष्कराने प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पाकिस्तानी लष्कराने भारताला प्रत्युत्तर देत म्हटलं की, पाकिस्तानी लष्कर प्रत्येक शत्रूच्या प्रदेशात लढण्यास सक्षम आहे, त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात भविष्यात होणारे कोणतेही युद्ध विनाशाचे रुप घेईल.
तसेच पुढे त्यांनी म्हटं की, " भारताने म्हटल्याप्रमाणे, पाकिस्तानला नकाशावरून पुसून टाकण्याबाबत, भारताने हे जाणून घेतले पाहिजे की जर अशी परिस्थिती जाणवली तर त्याचे दोन्ही बाजूंना परिणाम होतील. जर भारत पाकिस्तान यांच्यातील शत्रुत्वाचा नवीन अध्याय सुरु झाला तर पाकिस्तान मागे न हटता जोरदार प्रत्युत्तर देईल.
आम्ही देखील कोणताही संकोच किंवा संयम न बाळगता तुम्ही केलेल्या शत्रुत्वाला तोडीसतोड उत्तर देऊ. पाकिस्तानने आता एक नवीन दृष्टिकोन स्वीकारला आहे, जो जलद, निर्णायक आणि विनाशकारी असेल. अनावश्यक धमक्या आणि हल्ल्यांना तोंड देण्यासाठी पाकिस्तानचे सशस्त्र दल प्रत्येक शत्रू प्रदेशाविरुद्ध लढण्याची क्षमता ठेवतो. नवीन आदर्श निर्माण करण्याचा विचार करणाऱ्यांनी याबद्दल जाणून घेतले पाहिजे.